• +91-9822967263
स्वप्न विकासाचे , स्वप्न विकसित प्रभागाचे

माझ्या विषयी माहिती.

मी वैभव अप्पासाहेब ठाकरे. मी बी टेक पदवीधर असून कर्मवीर काकासाहेब अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक. येथे शिकत असतांनाच मला सामाजिक कार्याची आवड जडली तसेच विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेणे व त्यावर पर्याय शोधणे यावर माझं लक्ष कायमच वेधले जात होते.

महाविद्यालयात अकरावी मध्ये शिकत असताना मी नाशिक शहर विद्यार्थी सेनेचे काम सुरु केले. पक्षासोबत काम सुरु करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या प्रभावी पने मांडणे हेच होते आणि म्हणूनच वेळ वाया न घालवता मी लगेच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेन्यास सुरवात केली अनेक समस्या ह्या माझ्या माहितीत असल्याने लगेच सर्वत्र पाठपुरावा करून त्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले व त्या सोडवून घेतल्या.

साल २००३ ते २००५ ह्या वेळेत मी केलेल्या अनेक समस्यांचा पाठपुरावा तसेच सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाने माझ्यावर २००५ साली अभियांत्रिकी विभाग प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेना, नाशिक हे पद देऊन माझ्या कार्याचा सन्मान केला तसेच अजून कामांची देखील जबाबदारी सोपवली.

अश्या प्रकारे चालू झालेला माझा सामाजिक कार्याचा प्रवास हा आज पर्यंत निरंतर चालू आहे. आज पर्यंत च्या कार्यकाळात अनेक प्रकारची सामाजिक कामे माझ्या हातून घडली विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मी सोडवले अश्या प्रकारे अनेक कामे माझ्याकडून घडत गेली आणि ह्याच कामांचा उंचावता आलेख बघून पक्षाकडून मला अनेक जबाबदारी, पदे सोपवण्यात अली व ती मी पूर्ण तळमळतेने पूर्ण केली व आजही करत आहे.

स्वप्न विकासाचे , स्वप्न विकसित प्रभागाचे

राजकीय व सामाजिक कार्यातील काही महत्वाचे साल व मला मिळालेली पदे खालील प्रमाणे:

२००५ - अभियांत्रिकी विभाग प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेना, नाशिक.

२००६ - नाशिक शहर, उपमहानगर प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेना, नाशिक.

२००८ - नाशिक शहर, उपमहानगर प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेना, नाशिक.

२०१२ - जिल्हा सरचिटणीस, भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेना, नाशिक.

२०१९ - जिल्हा प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेना, नाशिक.

About About

स्वप्न विकासाचे , स्वप्न विकसित प्रभागाचे

प्रभागाचे विकासासाठी, लोकांच्या गरजांसाठी

आमच्याशी जोडले जा